केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासमवेत भेट

SHARE:

(उदय ठक्कर मुंबई) महाराज चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरचे कमिटी मेंबर आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेअर महासंघाचे अध्यक्ष श्री सुरेश भाई ठक्कर यांनी सांगितले की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर (MACCIA) च्या रिसर्च अँड इनोव्हेशन कमिटीचे चेअरमन *गौरव सोमवंशी* यांनी आपल्या भेटीदरम्यान *अध्यक्ष रविंद्र माणगावे* यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या *गाव तिथे उद्योजक या उपक्रमाची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी* यांना दिली .

या मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना, युवकांना उद्योजकतेच्या संधी तसेच *गाव पातळीवर आर्थिक स्वावलंबन* निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.

तसेच या प्रकल्पाचे व्यापक स्वरूप, राज्यभरातील संभाव्य परिणाम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी असलेली भूमिका याविषयीही मंत्रीमहोदयांना माहिती देण्यात आली. यासोबतच ‘गाव तिथे उद्योजक’ या *प्रकल्पाचे सविस्तर प्रेझेंटेशन* सादर करण्यासाठी मंत्रीमहोदयांकडे वेळ देण्याची विनंती करण्यात आली.

Dainik kesariya Hindustan
Author: Dainik kesariya Hindustan

सिर्फ खबरों से संबंधित ही संपर्क करें सम्पादक अशोक सोनी 9009601101 जुड़ने के लिए सम्पर्क करे प्रबंधक उजाला 8602385387 खबरों के लिए सम्पर्क करे दीपेश माहौर 8463846949

Leave a Comment

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई